ग़णित शिक्षणाचे पैलू भाग 2
या अभ्यासक्रमात तुम्हाला प्राथमिक शाळेत मुलांना अवघड वाटणार्या अपूर्णांक व दशांश अपूर्णंक या संकल्पनांबाबत अभ्यास करायचा आहे.या संकल्पना मुलांना अवघड का वाट्तात त्या नीट समजाव्या म्हणून नेमके काय करता येईल याचा विचार आपण या अभ्यासक्रमात करणार आहोत. अपूर्णांक व पुढे जाऊन परिमेय संख्या हा भाग माध्यमिक शाळेतील गणितशिक्षणाचा पाया आहे.तो कच्चा राहिल्याने बर्याच मुलांना गणित शिक्षणात अडचणी येतात असे मत या विषयात काम करणार्या तज़्ज्ञ श्रीमती सुझन लेमन यांनी मांडले आहे.
या संकल्पना शिकवण्याबाबत जगभरात उदंड काम झाले आहे या कामाचा आधार घेऊन तयार केलेले काही लेख तुम्हाला वाचायला मिळतील. तसेच काही स्वाध्यायांमध्ये प्रत्यक्ष मुलांसोबत काम करण्याचा अनुभवही घेता येईल. तसेच आपल्याला अनेक वेळा शाळेत नीट न समजलेल्या बाबी स्पष्ट होण्यासाठी देखील या अभ्यासाचा उपयोग होईल.